दोडामार्ग – प्रतिनिधी
दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजविला आहे. पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ओहोळ, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तालुक्यातील लहान पूल, काॅजवे पाण्याखाली गेले आहेत. कुंब्रल रूमडाची गोठण येथे एकाच्या घराजवळ दरड कोसळली. सुदैवाने लगतअसलेले घर यातून बचावले असले तरी घरातील कुटुंबियांची भीतीने गाळण उडाली आहे. दोडामार्ग – कोल्हापूर राज्यमार्गावर झाडांची तिलारी व आंबेली याठिकाणी पडझड झाली आहे. आंबेली येथे तर कोसळलेल्या झाडाखाली एक दुचाकीस्वार सुदैवाने बचावला. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे.
तालुक्यात मंगळवारपासून पाऊस जोरदार सुरू आहे. शनिवारी देखील जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळला. सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. ओहोळ, नाले भरून वाहत आहेत. तसेच तिलारी धरणातील पाण्याच्या पातळीतही कमालीची वाढ होत आहे. खराडी नदीचे पाणी तिलारी नदीला मिळत असल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. काही गावांतील लहान पूल, काॅजवे पाण्याखाली गेल्यामुळे त्या गावांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. शेती बागायतीतही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. दोडामार्ग-विजघर राज्यमार्ग तसेच इतर मार्गांवरही झाडांची पडझड झाली आहे. परिणामी काही काळ वाहतुक ठप्प झाली. काही मार्गांवर पडलेली झाडे वाहनचालकांनी बाजूला करत मार्ग मोकळा केला. दोडामार्ग बाजारपेठ ते गोवा रस्त्यावर पाणी साचल्याने रस्त्यावरून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. एकंदरीत अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









