वाळपई : सत्तरी तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली असून अंजुणे धरणाच्या पातळीमध्ये वाढ होत आहे. सोमवारी रात्री उशिरा धावे येथे माड पडून दोन कारचे नुकसान झाले. तर मंगळवारी दुपारी वाळपई, होंडा मार्गावरील सालेली या ठिकाणी एका माऊतीने झाडाला धडक दिल्यामुळे गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला. रात्री उशिरापर्यंत मुसळधार पाऊस कोसळत होता. गेल्या 24 तासांमध्ये सत्तरी तालुक्याच्या अनेक भागांमध्ये धुवाधार पाऊस कोसळत आहे. विशेषत: डोंगराळ भागांत जोरदार पाऊस पडत असल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. रात्री उशिरापर्यंत पावसाचा रोख असाच राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे आपत्कालीन व्यवस्थापनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. रात्री अनेक ठिकाणी बागयतीमध्ये पाणी घुसून काही प्रमाणात नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.
धावेत माड पडून दोन कारचे नुकसान
सोमवारी रात्री उशिरा धावे सत्तरी या ठिकाणी घराशेजारी असलेले माडाचे झाड वादळी वाऱ्यामुळे कोसळून दोन कारचे नुकसान झाली. यामध्ये महादेव उसपकर (उA04 ण् 5826),विलास उसपकर (उA03 ण्7103) या गाड्यांचे नुकसान झाले. दरम्यान वाळपई अग्निशामक दलाच्या यंत्रणेत तातडीने धाव माढ कापून हटविला. महादेव उसपकर यांच्या कारचे सुमारेत 1 लाखांचे विलास उसपकर यांच्या कारचे 70 हजार ऊपये नुकसान झाले.
सालेली येथील कारची झाडाला धडक
वाळपई होंडा मार्गावरील सालेली या ठिकाणी एका कारची झाडाला धडक दिल्यामुळे कारचे नुकसानी झाली. सदर कार वाळपई भागातून होंडा भागाकडे जात होती. अचानकपणे भटकी गुरे आल्यामुळे त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करताना कारवरील ताब सुटून बाजूच्या झाडाला धडक बसली. यामुळे गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसानी झाली. सुदैवाने कुणार दुखापत झाली नाही. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.
पाटवळ खोतोडा येथे झाड पडून वाहतुकीत व्यत्यय
मंगळवारी सकाळी खोतोडा पंचायत क्षेत्रातील पाटवळ येथील प्रमुख रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहतुकीला काही प्रमाणात व्यत्यय निर्माण झाला. अग्निशामक दलाच्या यंत्रणेत तातडीने धाव घेतल्यामुळे सदर झाड रस्त्यावरून हटविण्यात आले. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.









