मुंबई :
भारतीय जीवन विमा निगम अर्थात लाईफ इश्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी डिसेंबर तिमाहीचा निकाल जाहीर केला असून सदरच्या तिमाहीत 11056 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. एक वर्षाच्या आधी समान तिमाहीत कंपनीने 9444 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी सरकारी जीवन विमा कंपनी आहे. 1 सप्टेंबर 1956 साली एलआयसी कंपनीची स्थापना झाली. जीवन विमा, आरोग्य विमा, गुंतवणूक योजना आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक योजना यासारख्या वित्तीय सेवा ही कंपनी देत असते. मुंबईत मुख्यालय असणाऱ्या कंपनीची जवळपास 2048 कार्यालये असून 10 लाखापेक्षा अधिक एजंट कार्यरत आहेत. कंपनीचा नफा जाहीर झाल्यानंतर सोमवारी शेअरबाजारात कंपनीचे समभाग दबावात होते. समभाग 1 टक्का घसरत 807 रुपयांवर व्यवहार करत होता.









