9 मे पर्यंत राहणार खुला : कंपनी 3.5 टक्के हिस्सेदारी विकणार : पॅन लिंक असणे आवश्यक
वृत्तसंस्था/ मुंबई
लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया( एलआयसी) कंपनी भारतामधील सर्वात मोठा इनिशीयल पब्लिक ऑफर(आयपीओ) आजपासून खुला करणार आहे. कंपनीने यामधून जवळपास 3.5 टक्के हिस्सेदारी विकून साधारणपणे 21000 कोटी रुपये उभारणार असल्याचे संकेत यावेळी व्यक्त केले आहेत.
सदरचा आयपीओ हा आज बुधवार 4 मे ते 9 मे पर्यंत खुला राहणार आहे. यामध्ये प्राईस ब्रॅण्ड 902 ते 949 रुपये प्रति समभाग केला आहे. आयपीओमध्ये पॉलिसीधारकांना 60 रुपये आणि रिटेल गुंतवणूकदारांना 45 टक्के समभागात सवलत मिळणार आहे. कमीत कमी बोली ही 1 लॉटमध्ये (15 समभाग) आणि त्यानंतर 15 समभाग मल्टीपलमध्ये राहणार आहेत.
कमीत कमी व जास्तीत जास्त कमी पैसे लावता येतील?
रिटेल गुंतवणूकदार कमीत कमी एक लॉट म्हणजे 15 समभागांसाठी प्रस्ताव देऊ शकतात. या हिशोबाने रिटेल गुंतवणूकदारांना 45 रुपये सवलत मिळाल्यानंतर कमीत कमी 13,560 रुपये लावावे लागतील. जास्तीत जास्त मर्यादा ही 14 लॉट असून म्हणजे 210 समभाग. गुंतवणुकीसाठी जास्तीत जास्त 1,89,840 रुपये लावता येतील. या प्रकारे पॉलिसीधारकांसाठी 60 रुपयाची सवलत मिळाल्यानंतर कमीत कमी 13,335 रुपये आणि जास्तीत जास्त 1,86, 690 ची गुंतवणूक करता येणार आहे.
पॉलीसी किती जुनी हवी?
डीआरएचपी आणि इश्यू घेण्यासाठी गुंतवणूकदारांकडे अधिकृत पॉलीसी असणे आवश्यक आहे. एलआयसीने डीआरएचपी 13 फेब्रुवारी रोजी फाईल केली होती. म्हणजे संबंधीत पॉलीसी ही 13 फेब्रुवारीच्या आतील हवी. तसेच 28 फेबुवारीपर्यंत पॅन पॉलीसीला लिंक असणे आवश्यक असणार असल्याचे म्हटले आहे. यासह अन्य नियम लागू होणार असल्याचे कंपनीने यावेळी सांगितले आहे.









