सरकारी विमा कंपनी एलआयसीची माहिती : जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस सोमवारी झाली सुचीबद्ध
वृत्तसंस्था/ मुंबई
लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) ने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ फायनान्शिअल सर्व्हीस लिमिटेड (जेएफएसएल) मध्ये 6.66 टक्के हिस्सेदारी विकत घेतली आहे. सरकारी विमा कंपनीने मंगळवारी याबाबत माहिती दिली. एक्स्चेंज फाइलिंगमध्ये, एलआयसीने विलिनीकरणाअंतर्गत कंपनीतील भागभांडवल विकत घेतल्याचे सांगितले आहे.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस सोमवारी शेअर बाजारात लिस्ट झाली, त्यानंतर सातत्याने घसरण होत आहे. आज कंपनीचा शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) वर 4.99 टक्क्यांनी घसरून 239.20 रुपयांवर व्यवहार करत आहे. त्याच वेळी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) वर 5 टक्केच्या लोवर सर्किटसह 236.45 वर व्यवहार करत आहे.
सोमवारी (21 ऑगस्ट) जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे शेअर्स बीएसईवर 265 रु. आणि एनएसईवर 262 रुपयांवर सूचीबद्ध झाले. यानंतर, बीएसईवर स्टॉक 5 टक्केच्या लोवर सर्किटसह 251.75 रुपयांवर बंद झाला.
गेल्या महिन्यात कंपनी आरआयएलपासून वेगळी
रिलायन्सची आर्थिक सेवा व्यवसाय कंपनी जिओ फायनान्शियल गेल्या महिन्यात मूळ कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमधून बाहेर पडली आहे. डिमर्जरनंतर, जिओ फायनान्शिअलच्या शेअरची किंमत 261.85 रुपये निश्चित करण्यात आली.
जागतिक वित्तीय सेवा कंपनी मॅक्वेरीने गेल्या वर्षी आपल्या अहवालात रिलायन्सच्या वित्तीय सेवा व्यवसायाला पेटीएम आणि इतर फिनटेक कंपन्यांसाठी बाजारातील वाढीच्या दृष्टीने मोठा धोका असल्याचे म्हटले होते.
गेल्या वर्षी मुकेश अंबानी यांनी जिओ फायनान्शिअलचे वेगळे युनिट बनवण्याची घोषणा केली होती. ही घोषणा करताना ते म्हणाले की, जिओ फायनान्शिअल हा तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय असेल, जो देशभरात डिजिटल पद्धतीने आर्थिक उत्पादने ऑफर करणार आहे.
रिलायन्सच्या वित्तीय सेवा व्यवसायात 6 कंपन्यांचा समावेश..
-रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्स लिमिटेड
-रिलायन्स पेमेंट सोल्युशन्स लिमिटेड
-जिओ पेमेंट्स बँक लिमिटेड
-रिलायन्स रिटेल फायनान्स लिमिटेड
-जिओ इन्फॉर्मेशन एग्रीगेटर सर्व्हिसेस लिमिटेड
-रिलायन्स रिटेल इन्शुरन्स ब्रोकिंग लिमिटेड









