क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
एलआयसी दक्षिण मध्य विभागीय आयोजित विभागस्तरीय कॅरम व बुध्दीबळ स्पर्धांचे निवड चाचणी व स्पर्धा गुरूवार दि.17 रोजी हॉटेल सन्मानच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेत तीन राज्यांच्या 76 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. राष्ट्रीय स्पर्धकांचा या स्पर्धेत समावेश असल्याची माहिती बी. पी. रवी यांनी पत्रकार परिषद दिली.
हॉटेल सन्मानच्या सभागृहात आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले सदर स्पर्धा कर्नाटक, आंध्र, तेलंगाना या तीन राज्यातील 76 खेळाडू सहभाग घेणार आहेत. बुध्दीबळ व कॅरम स्पर्धेत प्रत्येक 19 स्पर्धकांचा समावेश असणार आहे. गुरूवारी सकाळी 9 वाजता या स्पर्धेला प्रारंभ होणार असून या स्पर्धेचे उद्घाटन एलआयसीचे प्रमुख व्यवस्थापक आर. शशिकुमार त्याचप्रमाणे विभागीय व्यवस्थापक बी. पी. रवी, मनोज मिथवा, अतुल देशमुख आदी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या स्पर्धैत आंतरराष्ट्रीय कॅरमपटू अपुर्वा या स्पर्धेत सहभाग राहणार आहे. बुध्दीबळ स्पर्धेतील मानांकित खेळाडूही येणार आहेत. या स्पर्धेतील प्रत्येकी 4 खेळाडूंची गोवा येथे होणाऱ्या ऑला इंडिया एलआयसी स्पर्धेसाठी विभागीय संघाचा निवड करण्यात येणार आहे. विजेत्या पहिल्या तीन स्पर्धकांना बक्षिसे दिली जाणार आहेत. बुध्दीबळ स्पर्धेसाठी प्रमुख् पंच गिरीश बाचीकर व पार्थ सारथी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा चालणार आहेत.









