मुंबई
भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसीचा समभाग शेअरबाजारात बुधवारी तेजीत असताना दिसला आहे. सदरचा समभाग आता सात महिन्यांच्या उच्चांकावर कार्यरत आहे. बुधवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान एलआयसीचा समभाग 4.5 टक्के इतका वाढत 689 रुपयांवर पोहचला आहे. 27 जानेवारी 2023 नंतर हा समभाग पुन्हा वेगावर स्वार होताना दिसतो आहे. समभागात आतापर्यंत जवळपास 30 टक्के इतकी तेजी राहिली आहे.









