2.27 लाख कोटी प्रीमियम गोळा
मुंबई :
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) 2025-26 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 10,098 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. वार्षिक आधारावर त्यात 30.65 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने 7,729 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. जुलै-सप्टेंबर तिमाहीत कंपनीने 1,26,930 कोटी रुपयांचा प्रीमियम गोळा केला. 2025 मध्ये 1,20,326 कोटी रुपयांचा प्रीमियम गोळा केला होता त्यापेक्षा हे प्रमाण 5.49 टक्के जास्त आहे.
त्याचवेळी, एकूण उत्पन्न वर्षाच्या आधारावर 7.54 टक्क्यांनी वाढून 2,40,454 कोटी रुपये झाले. जुलै-सप्टेंबर तिमाहीत विमा कंपनीचे अॅसेट अंडर मॅनेजमेंट (एयूएम) 57,22,896 कोटी (सुमारे 57 लाख 23 हजार कोटी रुपये) होते, जे गेल्या वर्षीच्या याच तिमाहीपेक्षा 3.31 टक्के जास्त असल्याचे सांगितले जात आहे.









