नवी दिल्ली
गृहकर्ज वितरण क्षेत्रातील कंपनी एलआयसी हाऊसिंग फायनान्सने गृहकर्ज व्याजदरात नुकतीच वाढीची घोषणा केली आहे. यामुळे ग्राहकांना आता दर महिन्याला समान मासिक हप्त्याकरीता जादा रक्कमेची तरतूद करावी लागणार आहे. आता एलआयसीचे व्याजदर 8 टक्के इतके असणार आहेत. याआधी ते 7.50 टक्के इतके होते. रिझर्व्ह बँकेने अलीकडेच रेपो रेटमध्ये अर्धा टक्का वाढीची घोषणा केली होती. एलआयसीने दर वाढीचा निर्णय घेतला. दर वाढला तर गृहकर्जाची मागणी कायम राहण्याचा विश्वास कंपनीला वाटतो आहे.









