वृत्तसंस्था/ मुंबई
लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन यांनी खुल्या बाजारात देशातील लोकप्रिय पादत्राण निर्मिती कंपनी बाटा इंडियाचे 6.88 लाख अतिरिक्त समभाग खरेदी केले आहेत. या खरेदीच्या माध्यमातून बाटा इंडियामध्ये एलआयसीची हिस्सेदारी 4.47 टक्के वाढून 5 टक्क्यांपेक्षा थोडी जास्त झाली आहे.
20 मार्च 2023 रोजी बाटा इंडियाचे समभाग 1380 रुपयांवर कार्यरत असताना एलआयसीने व्यवहार केला असल्याची माहिती आहे.
गेल्या वर्षी जुलै आणि सप्टेंबर महिन्यामध्ये कंपनीच्या समभागाने 1980 रुपयांची उच्चांकी गाठली होती. यानंतरच्या काळामध्ये मात्र बाटा इंडियाच्या समभागाच्या भावात घसरण अनुभवायला मिळाली. या समभागाने 1370 ते 1390 नीच्चांकी गाठली होती. गेल्या एक वर्षाच्या काळामध्ये बाटा इंडियाच्या समभागात 29 टक्के इतकी घट दिसली.









