25 ऑगस्ट रोजी होणार प्रदर्शित
लीयाम नीसन पुन्हा एकदा रिट्रीब्यूशन चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा एक अॅक्शनपट असून तो 1994 च्या ‘स्पीड’ची आठवण करून देणारा आहे. या चित्रपटाची निर्मिती लायन्सगेटने केली असून याचे जागतिक स्तरावरील प्रदर्शन 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. या चित्रपटात लियाम नीसन हे बसऐवजी स्वत:च्या मुलांसोबत एका एसयुव्हीत अडकून पडल्याचे आणि बाहेर पडण्याच जोखीम न उचलू शकणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. स्वत:च्या मुलांच्या सुरक्षेला प्राथमिकता देत या स्थितीला ते कशाप्रकारे सामोरे जातील हे चित्रपटात पाहता येणार आहे.

25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होणार असल्याची माहिती लायन्सगेटच्या पदाधिकारी गायत्री गुलियानी यांनी दिली आहे. भारतात लियाम नीसन यांची लोकप्रियता पाहता हा चित्रपट चाहत्यांसाठी मोठी पर्वणी ठरेल असा आम्हाला विश्वास असल्याचे त्या म्हणाल्या.
या चित्रपटात लियाम नीसन यांच्यासोबत मॅथ्यू मोडाइन, नोमा डूमजवेनी, जॅक चॅम्पियन, लिली एस्पेल आणि एम्बेथ डेव्हिड्ज हे दिसून येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन निम्रोद एंटल यांनी केले आहे. तर याची कथा अॅन्ड्य्रू बाल्डविन, अल्बर्टो मारिनी आणि वार्ड पेरी यांची आहे. एयूम कोलेट-सेरा, शन्ना एडी, जुआन सोला, अॅन्ड्य्रू रोना, एलेक्स हेनमॅन यांनी याची निर्मिती केली आहे.









