वृत्तसंस्था/ मुंबई
एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाने त्यांच्या 11,607 कोटींच्या आयपीओसाठी किंमत बँड 1,080 ते 1,140 प्रति समभाग अशी निश्चित केली आहे. हा इश्यू पूर्णपणे ऑफर-फॉर-सेल आहे, ज्यामध्ये प्रमोटर एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंक. 101.8 दशलक्ष इक्विटी शेअर्स विकेल.
आयपीओमध्ये पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव देखील आहे, ज्यांना प्रति इक्विटी शेअर 108 ची सूट मिळेल. 7 ऑक्टोबर 2025 रोजी सबक्रिप्शन उघडतील आणि 9 ऑक्टोबर रोजी बंद होतील, तर अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्यास 6 ऑक्टोबर रोजी सुरुवात होईल. 9 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूकदारांसाठी आयपीओ खुला राहील.
दुसरी कोरीयन कंपनी
भारतीय शेअर बाजारात दक्षिण कोरियन कंपनी आयपीओ लाँच करण्याची ही दुसरी वेळ आहे. ह्युंडाई मोटर्स इंडियाचा आयपीओ गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लाँच झाला होता आणि कंपनी बीएसई-एनएसई वर सूचीबद्ध होती.
किमान गुंतवणूक
किरकोळ गुंतवणूकदार 13 शेअर्स असलेल्या एका लॉटसाठी बोली लावू शकतात. आयपीओच्या 1,140 च्या वरच्या किंमत पट्ट्यावर एका लॉटसाठी अर्ज करण्यासाठी 14,820 ची गुंतवणूक आवश्यक असेल.









