सेबीकडून ड्राफ्टला मिळाला हिरवा कंदील : साधारण 15,000 कोटींचा समावेश राहणार
वृत्तसंस्था / मुंबई
दक्षिण कोरियाची एलजी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी त्यांच्या भारतीय युनिटचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) लाँच करणार आहे. बाजारातील नियामक सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने एलजीच्या ड्राफ्ट पेपर्सना मान्यता दिली आहे. या आयपीओचा इश्यू आकार 15,000 कोटी रुपये असेल. हा इश्यू विक्रीसाठी ऑफर आहे, ज्याद्वारे 10 रुपयांच्या दर्शनी मूल्याचे 10.18 कोटी इक्विटी शेअर्स विकले जातील.
यापूर्वी, कंपनीने 19 डिसेंबर रोजी सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला होता. हा देशातील आतापर्यंतच्या टॉप-5 सर्वात मोठ्या आयपीओपैकी एक असेल या इश्यूसाठी डीआरएचपीने मॉर्गन स्टॅनली, जेपी मॉर्गन, अॅक्सिस कॅपिटल, बोफा सिक्युरिटीज आणि सिटीग्रुप यांना मुख्य व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले आहे.
मूल्यात होणार वाढ
1.8 अब्ज डॉलर्सच्या आयपीओनंतर, जेव्हा समभाग सूचीबद्ध होतील, तेव्हा एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मूल्यांकन सुमारे 13 अब्ज डॉलर्स किंवा 1.10 लाख कोटी रुपये असू शकते. एलजी इंडियाने 2030 पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स महसुलात 75 अब्ज डॉलर्सचे लक्ष्य ठेवले आहे. एलजी इंडियाने 2030 पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स महसुलात 75 अब्ज डॉलर्सचे ध्येय ठेवले आहे.
7500 कोटीच्या महसुलाचे उद्दिष्ट
कंपनीचे महसुलाचे ध्येय हे 7,500 कोटी डॉलर्स आहे. एलजी इलेक्ट्रॉनिक्स हा आयपीओ एका धोरणाचा भाग म्हणून राबवत आहे कारण कंपनीने 2030 पर्यंत 7,500 कोटी डॉलर्सचे इलेक्ट्रॉनिक्स महसुलाचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय पुन्हा रुळावर आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. कंपनीचे सीईओ विल्यम चो यांनी ऑगस्टमध्ये ब्लूमबर्ग दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले होते.









