वृत्तसंस्था / शांघाय (चीन)
शनिवारी येथे झालेल्या चायनीज एफ-1 ग्रा प्रि मोटार रेसिंग शर्यतीचे अजिंक्यपद फेरारी चालक लेव्हीस हॅमिल्टनने पटकाविले. 2025 च्या ग्रा प्रि मोटार रेसिंग हंगामातील हॅमिल्टनने फेरारीला हे पहिले विजेतेपद मिळवून दिले आहे.
शनिवारी झालेल्या या शर्यतीमध्ये हॅमिल्टन आणि रेडबुल चालक मॅक्स व्हर्स्टेपन यांच्यात शेवटच्या टप्प्यातही चुरस निर्माण झाली होती. या टप्प्यात हॉलंडच्या हॅमिल्टनने व्हर्स्टेपनला मागे टाकले. त्याच प्रमाणे मॅक्लेरेनच्या ऑस्कर पिसेट्रीने पिछाडीवरुन मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला पण हॅमिल्टनने पिसेट्रीला 6.9 सेकंदाच्या कालावधीने मागे टाकत जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. लेव्हिस हॅमिल्टनने आपल्या वैयक्तिक मोटार रेसिंग कारकिर्दीत एकूण 104 शर्यती जिंकल्या आहेत तर त्याने 7 वेळा चायनीज ग्रा प्रि शर्यत जिंकून यापूर्वीच्या नोंदविलेल्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. व्हर्स्टेपनला दुसऱ्या तर पिसेट्रीला तिसऱ्या आणि मर्सिडीज चालक जॉर्ज रसेलला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.









