ओटवणे / प्रतिनिधी
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या सावंतवाडी तालुका कार्यकारणीची मागणी
Letter to Tehsildar and Group Development Officer to reduce blood price hike charges
राष्ट्रीय रक्तधोरण व्यवस्थापनांतर्गत रक्त व रक्तघटक पुरवण्यासाठी आकारण्यात येणारे वाढीव शुल्क कमी करण्याबाबत सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या सावंतवाडी तालुका कार्यकारणीच्यावतीने तहसिलदार विलास उंडे सावंतवाडी तसेच सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही एम नाईक यांना निवेदन देण्यात आले.यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य एकनाथ चव्हाण आणि सावंतवाडी तालुका खजिनदार सिद्धार्थ पराडकर उपस्थित होते.
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान ही रक्तदान, अवयवदान, देहदान आदीसाठी सदैव तत्पर असणारी नोंदणीकृत संस्था आहे. वेळीच रक्तपुरवठा करुन एखाद्याचा जीव वाचविणे हे संस्थेचे आद्यकर्तव्य असुन सामाजिक जबाबदारी म्हणून शासनाच्या धोरणाला अनूसरुन रक्तदान चळवळीच्या विविध कार्यात कार्यरत राहणे हा संस्थेच्या कार्याचा एक भाग आहे. संस्थेने सातत्याने अनेक रक्तदान शिबिरांचे आयोजन करून हजारो रुग्णांना रक्त उपलब्ध करुन दिले आहे. आर्थिक दुर्बलांना रक्तकार्डही देताना प्रसंगी पैसेही दिले आहेत. रक्ताबरोबरच प्लेटलेटस, प्लाझ्मा दानही संस्थेच्या सदस्यांनी केले आहे.
प्रतिष्ठानच्या जिल्ह्यात जिल्ह्यातील आठ तालुका कार्यकारणीसह सुमारे २००० सदस्य कार्यरत आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या संस्थेत समावेश आहे. तसेच संस्था जिल्ह्यातील एकूण ७४३ गावामध्ये रक्तदान चळवळीबाबत जनजागृती करत आहेत. ज्या गावात कधीही रक्तदान शिबिरे झाली नाहीत अशा अनेक गावांनी रक्तदान शिबिरे घेऊन संस्थेचे सर्व सदस्य कुणालाही रक्त, प्लेटलेटस्, प्लाझ्मा आवश्यकता असल्याचे समजताच तात्काळ उपलब्ध करतात.









