Udayanraje Bhosale On Singh Koshyari : शिवाजी महाराज देशाची अस्मिता आहेत. त्यांच्याबद्दल प्रत्येकानं सांभाळून बोललं पाहिजे.राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात जनतेत असंतोष आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सर्व खासदारांचं एकमत आहे.शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांविरोधात पंतप्रधान कार्यालयात आज पत्र दिल्याची माहिती छत्रपती उदयनराजे यांनी दिली. आज ते नवी दिल्लीत पत्र देण्य़ासाठी गेले आहेत यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात जनतेत असंतोष आहे. देशभरातील शिवभक्त नाराज आहेत. त्यामुळे लवकरात लवकर राज्यपालांवर कारवाई व्हावी अशी मागणी उदयनराजे यांनी केली. 23 नोव्हेंबरला राष्ट्रपतींना पत्र लिहल होतं. आजही प्रकियेनुसार पंतप्रधान मोदींना पत्र पाठवलं. मोदींपर्यंत आमची भूमिका पोहचली आहे.पंतप्रधानांना प्रकरणाची तीव्रता माहिती आहे. या मुद्याकडे राजकीय नजरेतून पाहता कामा नये. प्रक्रियेनुसार कारवाई होईल अशी खात्री आहे असेही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








