आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांची माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
आपले काँग्रेस सरकार असताना अनेक उत्तम विकासकामे केली आहेत. याच कामांच्या आधारे आम्ही येत्या निवडणुकीत विजयी होऊ, असा विश्वास बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला.
कुडची विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी आणि पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी 6 दिवसांच्या सायकल रॅलीच्या शेवटच्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पक्षाचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या शासन काळात जनहिताच्या अनेक योजना हाती घेतल्या होत्या. याची माहिती घरोघरी पोहोचविणे गरजेचे आहे. राज्याच्या विकासासाठी उत्तम उमेदवार निवडले जातील. सर्व नेत्यांनी आता एकत्र येऊन निवडणुकांना सामोरे जाणे गरजेचे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी महावीर मोहिते, दस्तगीर कागवाडे, भीमाप्पा बदनीकायी, एन. एस. चौगुला, रेवण्णा सरव, लक्ष्मणराव चिंगळे, आर. एम. गस्ती, सदाशिव ठक्कण्णावर यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या.









