आमदार प्रवीण आर्लेकर यांचे आवाहन : पेडणे मतदारसंघात ‘टिफिन पे चर्चा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
पेडणे : पेडणे मतदारसंघातील जे भाजप कार्यकर्ते भाजप पक्षापासून काही कारणास्तव दूर गेलेले आहेत, या सर्वांना एकत्रित आणून त्यांच्या समस्या, प्रश्न ऐकून सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत या सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून पेडणे मतदारसंघातून मोठे मताधिक्य भाजपला मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी नागझर येथे हिरा फार्ममध्ये ‘टिफिन पे चर्चा’ कार्यक्रमांतर्गत भाजपच्या ज्येष्ठ तसेच युवा कार्यकर्त्यांसोबत विविध विकासकामे व पक्षकार्याबाबत चर्चा केली.
यावेळी पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस, सरचिटणीस तथा नगरसेविका उषा नागवेकर, पेडणे नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर, निमंत्रक तथा माजी जिल्हा पंचायत सदस्य सूर्यकांत तोरस्कर, नगरसेविका तृप्ती सावळ देसाई, नगरसेविका विशाखा गडेकर, नगरसेवक शिवराम तुकोजी, नगरसेवक बाप्पा उर्फ विष्णू साळगावकर, नगरसेवक शिवराम तुकोजी, नगरसेवक माधव सीनाई देसाई, महिला कार्यकर्त्या भारतीय सावळ, माजी सरपंच संगीता गावकर, कोरगाव माजी सरपंच स्वाती गवंडी ,सरपंच समीर भाटलेकर, पंच दिवाकर जाधव, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ देसाई, माजी जि. पं. सदस्य तुकाराम हरमकर, धारगळ माजी सरपंच भूषण नाईक, नम्रता नाईक, कासारवर्णे सरपंच नवनाथ नाईक, वजरी सरपंच अनिल शेट्यो, माजी सरपंच अशोक सावळ, उपसरपंच उत्तम वीर, खाजने-अमेरे-पोरस्कडे सरपंच निशा हळदणकर, तोरसे सरपंच प्रार्थना मोटे, विर्नोडा सरपंच सुजाता ठाकूर, इब्रामपूर सरपंच अशोक धावस्कर, प्रतीक्षा आरोलकर, प्रदीप आरोलकर, महेश परब, पंच स्वाती मालपेकर, नानू हरमलकर, मोहन तळवणेकर, कांता आसोलकर, उद्देश धावस्कर, भावला उर्फ दीपक मांद्रेकर, प्रेमनाथ धारगळकर, जयेश पालयेकर, नवसो कशालकर, विर्नोडा माजी सरपंच प्रशांत राव, उपनगराध्यक्ष विश्राम गडेकर, माजी नगराध्यक्ष स्मिता कुडतरकर, वारखंड सरपंच गौरी जोसालकर, देवानंद गावडे, बाळू ठाकूर, मधू पेडणेकर, नवनाथ तोरस्कर, पंच रश्मी मळीक, माजी सरपंच संतोष मळीक, पंच ऊपम कांबळी, पंच रोशन गावस, उपसरपंच कृष्णा हरिजन आदींसह विविध पंचायतींचे पंच सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षापासून दूर गेलेले कार्यकर्ते संघटित : प्रवीण आर्लेकर
मोठ्या संख्येने आज टिफिन पे चर्चा करण्यासाठी पक्षापासून दुरावलेले कार्यकर्ते एकत्रित आल्यामुळे आपल्याला समाधान प्राप्त होत आहे. सर्वांनी मिळून संघटितपणे कार्य करून आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदारच्या उमेदवाराला या मतदारसंघातून विक्रमी मताधिक्य मिळवून देण्याचा कार्यकर्त्यांनी यावेळी निर्धार केला. आजपर्यंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या विकास कामावरही यावेळी चर्चा करून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन यावेळी आमदार आर्लेकर यांनी केले. पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ज्या पद्धतीने विकासकामे योग्य दिशेने केलेली आहे. त्याच बळावर येणारी लोकसभा निवडणुकीत पेडणे मतदारसंघातून मोठ मताधिक्य कार्यकर्ते देतील, असा विश्वास तुळशीदास गावस यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे नियोजबद्ध आयोजन!
पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात भाजप सरकार विकास कामाबरोबरच विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करते. पक्षापासून काही कार्यकर्ते जे दूर गेले आहेत त्यांना संघटित करून त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाची नियोजनबद्ध आखणी करून खूप दिवासनंतर सर्वांना एकत्र आणण्याबद्दल उषा नागवेकर आमदार प्रवीण आर्लेकर यांना धन्यवाद दिले. यावेळी सूर्यकांत तोरसकर, संगीता गावकर, रमेश सावळ यांनी अनुभव कथन केले.
मगोचेही कार्यकर्ते झाले होते सहभागी
पेडणे मतदारसंघात टिफिन पे चर्चा कार्यक्रमात मागील विधानसभा निवडणुकीत मगो पक्षाचे उमेदवार राजन कोरगावकर यांच्यासाठी काम केलेले कार्यकर्तेही टिफिन पे चर्चा कार्यक्रमात सहभागी झाले होते.
आमदारांनी वाढली जेवणाची पंगत
‘टिफिन पे चर्चा’ या कार्यक्रमांतर्गत काही कार्यकर्त्यांनी आपल्या घराकडून डबे आणले होते. काही जणांना जेवणाची सोय आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केली होती. दुर्मीळ होत चाललेली पंगत पहावयास मिळाली. पंगतीत बसलेल्यांना आमदार प्रवीण आर्लेकर यांनीही जेवण वाढण्यात सहभाग घेतला. काही जणांनी विशेष म्हणजे नाचणीच्या भाकरी आणल्या होत्या. कार्यकर्त्यांनी जेवणाचा आस्वाद केळीच्या पानावर घेतला. कार्यकर्त्यांनी यावेळी आणलेले विविध प्रकारच्या प्रदार्थांचे एकमेकांना वाढण्यात आले. नाचणीच्या भाकरी ठरल्या जेवण्याच्या पंगतीत मुख्य आकर्षण ठरल्या.









