शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदींचा सहकाऱ्यांशी संवाद : 100 दिवसांच्या रोडमॅपवर चर्चा, प्रलंबित योजना पूर्ण करण्याचे निर्देश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधानपदाच्या शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी 11.30 वाजता पंतप्रधान निवासस्थानी संभाव्य पॅबिनेट मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या सरकारचे व्हिजन शेअर करत ‘मोदी 3.0’ च्या पहिल्या 100 दिवसांच्या रोडमॅपवर चर्चा केली. हा रोडमॅप अमलात आणायचा असून प्रलंबित योजनाही पूर्ण करायच्या आहेत, असे मोदी म्हणाले. जो काही विभाग तुम्हाला मिळेल, त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, असेही ते म्हणाले. आपल्या लक्ष्य गाठण्यासाठी प्रत्येकाने कसून मेहनत घेण्याची आवश्यकता असून ‘विकसित भारत’चे स्वप्न साकार करुया असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
पंतप्रधानांनी आपल्या 7 लोककल्याण मार्ग या निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांसोबत रविवारी सकाळी चहापानाचे आयोजन केले होते. यामध्ये राजनाथ सिंह, अमित शहा, जे. पी. न•ा, नितीन गडकरी, मनोहरलाल खट्टर, शिवराज सिंह चौहान, सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य सिंधिया, धर्मेंद्र प्रधान, डॉ. एस. जयशंकर, जयंत चौधरी, किरण रिजिजू, अनुप्रिया पटेल, रवनीत सिंग बिट्टू, जितीन प्रसाद यांचा मुख्यत्वाने समावेश होता. तसेच पंकज चौधरी, राजीव (लालन) सिंग, संजय सेठ, शोभा करंदलाजे, गिरीराज सिंह, रामदास आठवले, नित्यानंद राय, बी. एल. वर्मा, अन्नपूर्णा देवी, अर्जुन राम मेघवाल, पीयूष गोयल, राव इंद्रजित सिंग, अजय टमटा, चितन राम मांझी, पासवान, निर्मला सीतारामन, जी किशन रे•ाr, बंडी संजय आदी नेतेही उपस्थित होते.
विदेशातून सात देशांच्या नेत्यांचे आगमन
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी शेजारच्या 7 देशांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू रविवारी सकाळी पहिल्यांदा भारतात पोहोचले. त्यांच्यानंतर लगेचच मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ हेही दिल्लीत आले. दुपारी बाराच्या सुमारास भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे आणि श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. नेपाळचे पंतप्रधान प्रचंड हेही सुरुवातीला दाखल झाले होते. दुसरीकडे, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ एक दिवस आधीच भारतात पोहोचले होते.
विदेशी निमंत्रित पाहुणे…
मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू,
मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना
सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ
भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे
नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’