सावंतवाडी : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे शिक्षण तसेच मराठी भाषा मंत्री दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे 18 जुलै रोजी एसटी बस स्थानक व्यवस्थेसाठी आंदोलन होणार आहे. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सिंधुदुर्ग राज्य परिवहन महामंडळाला हा शेवटचा इशारा दिलाय . पुढच्या काही दिवसात जर सावंतवाडी बसस्थानकाची दुरावस्था दूर केली नाही तर येत्या १८ जुलै म्हणजे दीपक केसरकर यांच्या वाढदिवसादिवशी आंदोलन करून त्यांना अनोखे गिफ्ट दिले जाईल . एसटी महामंडळाच्या वतीने होत असलेले प्रवाशांचे हाल बघवत नाहीत . विद्यार्थी , शिक्षक , निमसरकारी कर्मचारी, शासकीय कर्मचारी , प्रवासी ,कष्टकरी गावातून येणारे शेतकरी ,शहरांमध्ये येणारे नोकरदार, यांना जीव मुठीत घेऊन कसरत करावी लागत आहे. बस स्थानकाची झालेली दयनीय अवस्था सुधारा एसटी बसस्थानकाचा परिसर स्वच्छ करा, प्रवाशांना मूलभूत सुविधा द्या, बसस्थानकात मोठा पाऊस आल्यावर पत्र्यांमधून पाणी गळते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्थानकातील शौचालय क्लीन शौचालय असायला हवं. रात्रीच्या वेळी स्टॅण्डचा परिसर काळोखात बुडालेला असतो तर आवश्यक त्या सर्व लाईट सुरु करा पुढच्या काही दिवसांमध्ये या सर्व समस्या सोडवा अन्यथा जनआंदोलन करू असा थेट इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिलाय . आणि या आंदोलनाची पूर्ण जबाबदारी सिंधुदुर्ग जिल्हा राज्य परिवहन महामंडळावरती राहील असेही त्यांनी सांगितले .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









