Satara : कोरेगाव तालुक्यातील नागझरी ग्रामपंचायतमधील मागील पाच वर्षाचा मागासवर्गीयांचा पंधरा टक्के निधी सार्वजनिक मागणी करून सुद्धा आज अखेर मिळाला नाही. सदरचा निधी त्वरित मिळावा व आज अखेर निधी न देणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी बुद्ध धर्म मित्र मंडळ व मागासवर्गीय नागझरी ग्रामस्थ यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये महिलांनी सक्रिय सहभाग घेतला.
मागासवर्गीयांसाठी शासनाकडून देण्यात येणारा निधी गेल्या पाच वर्षापासून सतत मागणी करूनही नागझरी ग्रामपंचायतीने दिला नाही. याची चौकशी करून आम्हाला अनुदान मिळावे या मागणीसाठी मागासवर्गीय ग्रामस्थांनी आंदोलन छेडले आहे.आताही जर दखल घेतली नाही तर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









