पणजी प्रतिनिधी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा क्रांतिदिनाच्या ऐतिहासिक प्रसंगी गोव्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा व्यक्त दिल्या आहेत.
गोवा क्रांतिदिन हा स्वातंत्र्य चळवळीचा शेवटचा टप्पा होता. ज्यात हजारो गोमंतकीयांनी स्वेच्छेने सहभाग घेतला. हा काळ स्वातंत्र्यसैनिकांच्या परमोच्च बलिदानाचा साक्षीदार होता. अनेकांनी हौतात्म्य पत्करले आणि अनेक लोकांना तुरूंगवास, संकटाना तोंड द्यावे लागले, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले आहे.
गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या आदरणीय हुतात्म्यांच्या आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे आणि शौर्याचे आपण स्मरण करूया आणि त्यांना अभिवादन करून आदरांजली वाहण्याचा हा प्रसंग आहे. चला आपण एकत्र येऊन हातात हात घालून कष्टाने मिळविलेल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न करून अधिकाधिक प्रगती साधण्यासाठी स्वत:ला झोकून देऊया, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी संदेशात म्हटले आहे.









