सत्तरी भूमिपुत्र संघटनेचा पत्रकार परिषदेत इशारा : प्रस्ताव फेटाळल्याने मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्याचे अभिनंदन : व्याघ्र क्षेत्र प्रकल्प स्वीकारणार नाहीच
वाळपई : व्याघ्र क्षेत्र प्रकल्प सत्तरी तालुक्मयामध्ये झाल्यास सत्तरी तालुक्मयातील गाव उध्वस्त होणार आहेत. व्याघ्र क्षेत्र प्रकल्पासाठी विविध ठिकाणी बैठका घेणाऱ्या पर्यावरणवाद्यांनी सत्तरी तालुक्मयात अशा प्रकारच्या बैठकीचे आयोजन केल्यास तो उधळून लावण्याचा इशारा सत्तरी भूमिपुत्र संघटनेने केला आहे. वाळपईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पर्यावरणवाद्यांना इशारा देऊन सत्तर तालुक्मयातील जनता व्याघ्र क्षेत्र प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे. या संदर्भाची भूमिपुत्र संघटनेची पत्रकार परिषद वाळपई येथे रविवारी संध्याकाळी संपन्न झाली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र गावस, सचिव आतानियो पिंटू सभासद बातू गावडे, कृष्णा केरकर, शिवाजी झर्मेकर व इतरांची उपस्थिती होती.
अभयारण्याचे भूत अजूनही मानगुटीवर
1999 सालापासून अभयारण्याचे भूत अजूनही सत्तरी तालुक्मयातील 31 गावाच्या जनतेच्या मानगुटीवर बसलेले आहे. यामुळे अनेक प्रकारच्या गहन समस्या सातत्याने निर्माण होत आहेत. अभयारण्याची अधिसूचना रद्द करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मात्र ती अद्याप मान्य झालेली नाही. तर दुसऱ्या बाजूने अभयारण्याच्या ज्याचक अटीचा फास संबंधित गावातील जनतेच्या गळ्याभोवती आवळू लागला आहे. याबाबत भूमिपुत्र संघटनेने चिंता व्यक्त केली व अधिसूचना रद्द करावी अशा प्रकारची जोरदार मागणी केली.
व्याघ्र प्रकल्प प्रस्ताव फेटाळला- सरकारचे अभिनंदन
तालुक्मयातील जनतेच्या व्यथा या संदर्भाची जाणीव राज्याचे वनमंत्री विश्वजीत राणे व गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व आमदार डॉ. देविया राणे यांना पूर्णपणे आहे. यामुळे त्यांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध केल्यामुळे हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. यामुळे भूमिपुत्र संघटनेतर्फे सरकारचे व संबंधिताचे अभिनंदन करण्यात आले.
प्रथम अभयारण्यक्षेत्र समाविष्ट गावांची पाहणी करा!
अभयारण्य क्षेत्रामध्ये व्याघ्र प्रकल्प राबविण्याची मागणी काही पर्यावरणवादी एसी केबिनमध्ये राहून पत्रकार परिषदतून करीत आहे. त्यांना सत्तरी तालुक्मयातील समस्याग्रस्त जनतेचे काही पडलेले नाही. त्यांना या संदर्भाची कोणतीही जाणीव नाही. त्यामुळे अशी मागणी करणाऱ्या पर्यावरणवाद्यांचा यावेळी निषेध करण्यात आला. संबंधितांनी अभयारण्य क्षेत्रात समाविष्ट गावांची पाहणी करण्याचे आवाहन यावेळी भूमिपुत्र संघटनेतर्फे करण्यात आले.
त्यावेळी पर्यावरणवादी कुठे होते?
गेल्या पाच वर्षांमध्ये अभयारण्य क्षेत्रामध्ये दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. करंझोळ कुमठोळ येथे तत्कालीन वनाधिकारी नारायण प्रभुदेसाई यांनी हवेत गोळीबार करून ग्रामस्थांसमोर दहशत निर्माण केली. यावेळी ग्रामीण भागातील एकूण 22 जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. आपल्या अस्तित्वासाठी लढा देणाऱ्या अशा भूमिपुत्रांवर जेव्हा गुन्हे दाखल करण्यात येत होते तेव्हा पर्यावरणवादी कुठे झोपले होते? त्याचप्रमाणे चार वर्षांपूर्वी गोळावली या ठिकाणी चार पट्टेरी वाघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याला जबाबदार धरून तीन धनगर बांधवांवर गुन्हे दाखल केले. त्यावेळी पर्यावरणवादी कुठे होते? असा सवालाही यावेळी हरिचंद्र गावस यांनी केला.
सत्तरी तालुक्मयात बैठक घेऊनच दाखवा
व्याघ्र क्षेत्र प्रकल्प घोषित करण्याची मागणी काही पर्यावरणवाद्यांकडून पत्रकार परिषदेतून केली जात आहे. सत्तरीत व्याघ्र प्रकल्पाच्या समर्थनार्थ बैठका घेतल्यास त्या हाणून पाडू, असा इशारा भूमिपुत्र संघटनेचे सचिव आतानियो पिंटू यांनी दिला आहे.
अभयारण्य क्षेत्रामध्ये पट्टेरी वाघच नाहीत.
अभयारण्याच्या परिक्षेत्रामध्ये पट्टेरी वाघ असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. वन खात्याच्या पॅमेरा ट्रॅपमध्ये आढळून आलेले पट्टेरी वाघ हे अभयारण्य क्षेत्रामध्ये वास्तव्य नसून ते इतर जंगलातून अधूनमधून या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी कायमस्वरूपी वाघच नसल्याचा दावा भूमिपुत्र संघटनेने केलेला आहे.ज्यांना सत्तरी तालुक्मयातील गावांची संख्या माहीत नाही त्यांनी तालुक्मयातील जनतेच्या माथ्यावर व्याघ्र क्षेत्र प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्यास तो निश्चितच हाणून पाडू, असा इशारा शिवाजी झर्मेकर यांनी दिला.









