भाजपच्या संघटन पर्व कार्याशाळेत निर्धार
स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्तेसाठी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट साध्य करा
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन
कोल्हापूर
राज्यात भाजपचे फेब्रुवारी अखेरपर्यंत 1 कोटी 51 लाख सदस्य नोंदणी पूर्ण करण्याचा निर्धार रविवारी महासैनिक दरबार हॉल येथे झालेल्या भाजप संघटन पर्व कार्यशाळेत करण्यात आला. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. यासाठी सदस्य नोंदणीचे उदिष्ट पूर्ण करा, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. कार्यशाळेस कोल्हापूर, सांगली, सातारा जिह्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभासद नोंदणी टप्पा पूर्ण करून सक्रिय सभासद जे असतील त्याच कार्यकर्त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी ही जबाबदारी मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेस आता 1500 वरून 2100 रूपये देण्यात येणार आहे. प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दीड कोटी सदस्य नोंदणीसाठी 34 लाखांचा उद्दिष्ट बाकी आहे उद्दिष्ट गाठण्यासाठी पाच टप्प्यातून नोंदणी करावी, असे सांगितले.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्येक पाचशे लोकांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्यासाठी भारतीय जनता पार्टीतील बूथ अध्यक्ष व पदाधिकारी यांनी सक्रिय सभासद अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या. कार्यकर्त्यांना महायुतीतील फार्मूल्यानुसार विविध अशासकीय पदांच्या संधीचा लाभ देण्यात येणार असल्याचे सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थेतमध्ये कोण लढू शकतो, त्यास बळ द्यावे. त्याच्या मतदार संघात निधी देण्यासाठीही पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. आमदार विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प.महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. सुत्र संचालन अशोक देसाई यांनी केले तर आभार सदानंद राजवर्धन यांनी मानले. मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, रणजितसिंह निंबाळकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सुरेश हळवणकर, सुरेश खाडे, विक्रम पावसकर, विजय जाधव, राजवर्धन निंबाळकर, नाथाजी पाटील, महेश जाधव, भरत पाटील, राहुल चिकोडे आदी उपस्थित होते.
40 दिवसांत 1 कोटी 16 लाख सदस्य
जगात सर्वाधिक 15 कोटी सदस्य असणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. सध्या पक्षाच्यावतीने नूतन सदस्य नोंदणी सुरू असून महाराष्ट्रामध्ये 1 कोटी 67 लाखांचे टार्गेट दिले आहे. यापैकी 40 दिवसांतच 1 कोटी 16 लाख सदस्य झाले असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
योजनेतील लाभार्थ्यांना सदस्य करा
मोदीच्या नेर्तृत्वाखाली देशात विकासकामांचा सपाटा लावला आहे. विविध योजनाही सुरू केल्या आहेत. त्यामुळे भाजपबाबत राज्यात चांगले वातावरण निर्माण झाले आहे. लाडकी बहिण योजनेचे 2 कोटी 50 लाख लाभार्थी, वीज माफ होणारी 40 लाख शेतकरी यांनाही सदस्य करून घेण्याचे आवाहन मंत्री बावनकुळे यांनी केले.
स्थनिक स्वराज्य एप्रिल-मे मध्ये निवडणुका, 13 हजार कार्यकर्त्यांना सधी
कार्यशाळेमध्ये मंत्री बावनकुळे यांनी एप्रिल 2025 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक होणार असल्याचे संकेत देत कार्यकर्त्यांना आतापासून कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. 36 जिल्हा परिषद अध्यक्ष, 27 महापालिकांमध्ये महापौर, नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष आणि 70 हजार सरपंच महायुतीचे करण्यासाठी आतापासून कामाला लागा, असे आवाहनही केले. प्राथमिक सदस्य प्रमाणे सक्रीय सदस्यांची नोंदणीही झाली पाहिजे. सक्रीय सदस्य असल्यासच आगामी निवडणूकीत उमेदवारी दिली जाणार असून या निवडणूकीत 13 हजार कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात विरोधकच राहणार नाहीत : मंत्री चंद्रकांत पाटील
कोल्हापूर जिह्यातील भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश होणारी यादीच चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द केली असल्याचे सांगत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,. या पक्षप्रवेशामुळे जिह्यातील पार्टी सक्षम होणार आहे. सध्या कोल्हापूर जिल्हा भाजपचा बालेकिल्ला बनला असून अशीच स्थिती राहिली तर जिल्ह्यात विरोधकांचा सुफडा साफ होईल.जिल्ह्यात विरोधकच राहणार नाही. येणाऱ्या पाच वर्षात विरोधकांची काळी जादू लागू पडणार नसल्याचा टोला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला.








