10 स्टेडियमसाठी मिळणार 50 कोटी : मुंबई, चेन्नई, लखनौ, दिल्ली, अहमदाबादच्या खेळपट्टी, आसनव्यवस्थेत होणार सुधारणा
वृत्तसंस्था/ मुंबई
जेणेकरून स्टेडियममध्ये त्यांना आवश्यक त्या सुधारणा करता येतील. विशेष म्हणजे, भारत इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या आयसीसी इव्हेंटचे आयोजन करणार आहे. यामुळे बीसीसीआयने यंदाचा वर्ल्डकप ग्रँड करण्यासाठी कंबर कसली आहे.
वर्ल्डकपचे सामने हे 10 स्टेडियमवर होणार आहेत. या 10 स्टेडियमचा कायापालट करण्यासाठी बीसीसीआयने 500 कोटी रुपयांचे अतिरिक्त बजेट बाजूला काढून ठेवले आहे. वर्ल्डकप 2023 चे सामने हे अहमदाबाद, चेन्नई, मुंबई, धर्मशाला, दिल्ली, पुणे, बेंगळूर, हैदराबाद, लखनौ आणि कोलकाता येथे होणार आहेत. तर गुवाहाटी आणि तिरूवअनंतपुरम येथे सराव सामने होणार आहेत. या सर्व स्टेडियमच्या गरजा पाहून ते अद्यावत करण्याची योजना आखली आहे. स्टेडियममध्ये एलईडी लाईट्स पासून आसन व्यवस्था, कार्पोरेट बॉक्स या सर्वांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक स्टेडियमला प्रत्येकी 50 कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती बीसीसीआयमधील सूत्रांनी दिली.
10 स्टेडियममध्ये होणार सुधारणा
मुंबईच्या स्टेडियमवर नवीन फ्लड लाईट्स आणि कार्पोरेट बॉक्स बनवला जाणार आहे. कोलकातामध्ये ड्रेसिंग रुममध्ये सुधारणा केली जाणार आहे. धरमशाला स्टेडियमवर मागच्या काही महिन्यांपासून नवीन आउटफिल्ड बनवण्याचे काम सुरू आहे. तर पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर तात्पुरते छत तर दिल्लीमध्ये तिकिट सिस्टिम, सिट्स आणि टॉयलेट्सचे काम करून घेतले जाणार आहे.
चेन्नईमध्ये नवीन खेळपट्टी
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये दोन लाल मातीच्या खेळपट्ट्या तयार करण्यात येणार आहे. आयपीएलवेळी या खेळपट्टीवर खूप टीका झाली होती. याचबरोबर या स्टेडियमवर नव्या फ्लड लाईट्स देखील लावल्या जाणार असून बाथरुमपासून स्टँड पर्यंतच्या साफ सफाईवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.









