Bread Samosa Recipe: गरमागरम समोसे सर्वानाच आवडतात. पण आज आपण समोस्याची एक वेगळी रेसिपी जाणून घेणार आहोत. जी झटपट देखील होते आणि स्वादिष्ट देखील लागते.
साहित्य
धने – अर्धा चमचा
बडीशेप – अर्धा चमचा
जिरे – अर्धा चमचा
तेल
लसूण पेस्ट – १ चमचा
आले पेस्ट – १ चमचा
कसुरी मेथी – अर्धा चमचा
तिखट – अर्धा चमचा
हळद – अर्धा चमचा
मीठ चवीनुसार
उकडलेला बटाटा – एक मोठा
ब्रेड
पाणी
बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती
सर्वप्रथम धने,बडीशेप आणि जिरे खलबत्त्यात मोठे मोठे कुटून घ्यावेत. (याची पावडर करू नये.) यानंतर एका कढई मध्ये २ चमचे तेल घालावे आणि कुटलेले मिश्रण त्यात परतून घ्यावे. यानंतर त्यात लसूण पेस्ट ,कसुरी मेथी,हळद ,तिखट आणि चवीनुसार मीठ घालावे. यामध्ये सगळ्यात शेवटी आल्याची पेस्ट घालावी.यांनतर त्यामध्ये उकडलेला बटाटा किसून किंवा स्मॅश करून घालावा. आणि सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे. तयार झालेले बटाट्याचे सारण थंड करण्यासाठी बाजूला ठेवावे. आता समोसा करण्यासाठी मोठ्या ब्रेडचा स्लाइस घ्यावा आणि त्याच्या बाजूच्या सर्व कडा कापून घेऊन ब्रेड लाटून घ्यावा. आता ब्रेड त्रिकोणी आकारात कापून घ्यावा. यानंतर ब्रेड ला समोस्याचा आकार देण्यासाठी त्याच्या कडांना थोडसं पाणी लावून चिकटवून घ्या.आणि त्यामध्ये सारण भरून घेऊन समोस्याची दुसरी बाजू बंद करून घ्या. यांनतर सर्व समोसे मंद आचेवर टाळून घ्यावेत. तयार झालेले गरमागरम,कमी तेलकट आणि स्वादिष्ट समोसे टोमॅटो सॉस किंवा चिंच गुळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
Previous Articleदेशभक्त प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमाला १६ पासून
Next Article भीष्मासारखे दुःख सहन करण्यास आपण तयार : पंकजा मुंडे









