रत्नागिरी- प्रतिनिधी
रत्नागिरी तालुक्यातील चाफेरी गावामध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. या दहशतीचा थरारक प्रकार तेथील एका ग्रामस्थांच्या दारात सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
गेल्या आठ दिवसांमध्ये बिबट्याने या ठिकाणी मानवी वस्तीमध्ये तब्बल आठ कुत्र्यांची शिकार केली आहे. दरम्यान असाच एक प्रकार चाफेरी गावातील शरद चव्हाण यांच्या घरात घडलेला पाहायला मिळाला. घरासमोर बांधलेला कुत्र्यावर बिबट्याने पहाटेच्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात चव्हाण यांचा कुत्रा जखमी झाला आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. तसेच या आधीसुद्धा धामणसेमध्ये सांबरेवाडी, मोरेवाडी येथे वारंवार असे बिबट्याचे हल्ले होत आहेत. त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी चाफेरी आणि धामणसे येथील सर्व गावक-यांची केली आहे..









