Leopard movement in Talwane area; villagers are scared
तळवणे रवळनाथ माऊली टेंबवाडी भाटलेवाडी बर्डेवरवाडी येथे भरवस्तीत संध्याकाळी व रात्रीच्यावेळी बिबट्याची दहशत वाढली आहे यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत पाळीव कुत्रा पडवीत झोपलेला असताना बिबट्याने पडवीत जाऊन महिनाभर संध्याकाळी व रात्रीच्यावेळी बिबट्याचे येथे दर्शन होत आहे त्यामुळे संध्याकाळी सहानंतर येथील रहिवाशांना बाहेर पडणे मुश्कील बनले आहे . बिबट्या आपली भूक भागवण्यासाठी तेथील पाळीव कुत्र्यावर हल्ला करीत आहे या बिबट्याचा वनखात्याने लवकरात लवकर बंदोबस्त करावा , अशी मागणी तळवणे सरपंच रामचंद्र गावडे सदस्य सिद्धेश कांबळी सावळाराम घाट्ये व रेश्मा टाक्कर यांनी केली आहे.
न्हावेली / वार्ताहर









