डफळापूर,प्रतिनिधी
Leopard Goat Attack : जत तालुक्यातील बागेवाडी येथे बागेवाडी कुंभारी रस्त्यालगत असलेल्या नानासो पडळकर यांच्या शेतात कोल्हापूर येथील मेंढपाळ मेंढ्या चारवण्यासाठी आले होते.रात्री नानासो पडळकर यांच्या शेतात सर्व मेंढ्या एकत्रित करून थांबले असताना अचानक लांडग्याची दोन कळपे येऊन मेंढ्या वरती जोरदार हल्ला केला.या हल्ल्यात 26 मेंढ्या लांडग्यांनी ठार केल्या तर वीस मेंढ्या बेपत्ता झालेले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बागेवाडी येथे काल बिरू विठ्ठल जोग राहणार राशेवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथील काही मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन तालुक्यात चारण्यासाठी आले होते. त्यांनी नानासो पडळकर यांच्या शेतामध्ये मुक्काम केला.
अडीचशे मेंढ्या घेऊन त्यांनी रात्री मुक्काम केल्यानंतर रात्री बारा वाजता अचानक या मेंढ्याच्या कळपावरती लांडग्याने जोरदार हल्ला चढवला. हल्ला चढतास अनेक मेंढ्या सैरभर बाजूला इकडे तिकडे पळाल्या या हल्ल्यांमध्ये 26 मेंढ्या लांडग्याने जागेवरच ठार केल्या तर वीस मेंढ्या बेपत्ता आहेत. या घटनेची माहिती मिळताच जत तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजीराव पडोळकर बागेवाडीचे ग्रामपंचायत सरपंच करण शेंडगे ग्रामपंचायत लक्ष्मण चौगुले शेतमालक नानासो पडळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी या मेंढपाळांना कुंभारीचे नेते नाथा पाटील,मयूर पडळकर,नेताजी शेंडगे,पंडित पडळकर ,बाळू चौगुले ,पोपट सोलंकर ,बिरू मलमे हिवरे,समीर शेंडगे,सुनील शेंडगे यांनी मदत केली.