शिये,वार्ताहर
शिये (ता.करवीर) येथील मगदूम मळ्यात बिबट्याने हल्ला करून रेडकु फस्त केले आहे.परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुरुवारी रात्री संजय मगदूम यांच्या जनावरांच्या गोठ्यातील बांधलेले रेडकू बिबट्याने गोठ्याबाहेर ओढत आणुन ऊसाच्या शेतालगत बांधावर फस्त केले . रेडकाचा सांगाडा शिल्लक ठेवला आहे.तसेच ऊसाच्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे स्पष्ट दिसून येत आहेत.दरम्यान, घटनास्थळी वनरक्षक कृष्णात दळवी यांनी पाहणी केली. बिबट्या असल्याची शक्यता व्यक्त करत वरिष्ठाशी चर्चा करून या परिसरात कॅमेरे लावणार असल्याचे सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









