नांद्रे, प्रतिनिधी
शिरगांव -बेंद्री येथील सतीश शिंदे हे व्यवसायनिमित्याने गेली अनेक वर्ष नांद्रे येथे वास्तव्यास आहेत.आठवढ्याच्या प्रत्येक रविवारी बेंद्रीला जातात.या रविवारी सतीश शिंदे व पिंटू मदने हे बेंद्रीला गेले होते.राञी आठ वाजता हे दोघे नांद्रेकडे निघाले असता शिरगाव बेंद्री रस्त्यावर मोहरीवर दब्बा धरून बसलेल्या बिंबट्याने सतीश व पिंटू यांच्यावर हल्ला केला.परंतु प्रसंगसावधनताने सतीश शिंदे यांनी दुचाकीचा वेग वाढवत शिरगाव कवठे प्रयाण केल्याने हे दोघे बचावले.
सतीश शिंदे तरूण भारतशी बोलताना म्हणाले,आमच्यावर हल्ला करणारा बिंबट्या साधरण तीन फूट उंचीचा आसावा असा अंदाज व़्यक्त केला. हि वार्ता कळताच शिरगाव बेंद्री येथील नागरिकांनी मध्यराञी पर्यत शोधाशोध केली माञ, बिंबट्या आढलला नाही.या परिसरात शेतात वस्ती करून राहणारे लोक आहेत.तसेच पशुपालन व नांद्रे,खोतवाडी,शिरगाव,बेंद्री,कवठेएकंद या लोकांची शेती आसल्याने येथील नागरिकांत भितीचे वातावरण आहे.
गेल्या महिन्यापासून बिसूर,कर्नाळ,नावरसवाडी, नांद्रे, डिग्रज,शिरगाव,बेंद्री येथील परिसरात सातत्याने बिंबट्याचे दर्शन होत आसल्याने या परिसरात भितीचे वातावरण आहे. नांद्रे येथे एक रेडा,दोन शेळ्या,एक बोंकड यांच्यावर बिंबट्यानेच हल्ला केला आहे असे बोलले जात आसतानाच आज माणसावर बिंबट्याने हल्ला केल्याने भितीचे वातावरण होत आसून शेतीच्या कामावर परिणाम होत आहे. शिरगावचे सरपंच पुष्पा दुकाने,बेंद्री पोलीस पाटील गायकवाड, नांद्रेचे पोलीस पाटील सौ.स्वाती वंजाळे, मिरज पंचायत समितीचे माजी सभापती राहूल सकळे, ग्रा.पं.सदस्य मोहसीन मुल्ला,अभिजीत पाचोरे,यांनी येथील नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवहान केले आहे. वनविभागाने याकडे गार्भीयाने लक्ष देऊन बिंबट्याचा शोध घ्यावा आशी मागणी होत आहे.








