मानवी विकासामुळे पशुपक्षांकडे सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष : राजेंद्र केरकर
सांखळी / प्रतिनिधी
काही दिवसांपासून सांखळी परिसरात पर्यें, सुर्ला, वेळगे, कुडणे, सांखळीसह आसपास भागात बिबट्याचे अनेकांना सातत्याने झाले आहे. बुधवारी सुर्ला येथे एका वासरावर बिबट्या हल्ला चढवून त्यास जखमी केले. शिवाय परिसरातील कुत्री गायब होण्याच्या घटना वाढत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या घटनेची वनविभागचे अधिकाऱ्यांनी सुर्ला कडचाळ येथे येऊन घटनेची पाहणी केली.
उष्णतेचा पार चढल्यामुळे डिचोली सत्तरी तालुक्यातील सीमा भागात रानटी जनावरे पाण्याच्या शोधात लोकवस्तीकडे धाव घेत आहेत. हे प्राणी शेती बागातयतीत घुसून नुकसान करत आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. या समस्येवर शासनाने वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
मानवी विकासामुळे पशु-पक्षांकडे होतेय दुर्लक्ष : राजेंद्र केरकर
वाढत्या उष्णतेमुळे रानटी जनावरे पाण्याच्या शोधात लोकवस्तीकडे येताना निदर्शनास येत आहे, याचे मूख्य कारण म्हणजे पर्यावरणाचा जराही विचार न करता केलेला मानवी विकास आणि सरकारी संबंधित अधिकाऱ्यांचा डोळेझाकपणा कारणीभूत असल्याचे मत पर्यावरण प्रेमी, अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केले. नागरिकांनी काळजी घ्यावी मात्र घाबरण्याची गरज नाही, असेही केरकर म्हणाले.
कुत्री गायब होण्याचे प्रमाण वाढले
सांखळी परिसरातील ग्रामीण भागात पाळी, सुर्ल, वेळगे, कुडणे, हरवळे इत्यादी परिसरात कुत्री गायब होण्याच्या प्रकारात वाढ झाल्याचे स्थानिकांनी याविषयी बोलताना सांगितले. बिबट्या गावात राजरोस फिरत असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा येथील नागरिक करत असल्याने सरकारी संबधीत अधिक्रायांनी लक्ष देऊन खरी माहिती नागरिकांना समोर आणावी अशी मागणी केली जात आहे.
पक्षी जनावरे पाण्याच्या शोधत लोकवस्तीत
राज्यात उष्णतेचे प्रणाम वाढल्याने माणसा प्रमाणेच जनावरे ही गर्मीने हैराण झाले असून डिचोली आणि सत्तरी तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात पक्षी जनावरे पाण्याच्या शोधत लोकवस्ती कडे येताना दिसत आहे. माकड, खेती समूहाने बागायतीत प्रवेश करतात व केळी, पपई, अननस, आंबे यावर ताव मारताना दिसतात. फस्त करतानाच बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसानही करत आहेत. याचा गरीब शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली.
आपल्या अंगणात पक्षासाठी पाणी ठेवा : बाबलो नाटेकर
प्रंचड प्रमाण उष्णता वाढल्याने पक्षांना वारंवार पाण्याची आवश्यकता जाणवत असल्याने आपल्या गच्चीवर किंवा अंगणात पक्षांसाठी पाणी उपलब्ध करून ठेवल्यास त्यांची तहान भागू शकते, असे मत पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे. वाढत्या उष्णतेतही पक्षी, जनावरे, मुंग्या आपल्या सुरक्षेसाठी पावसाच्या पूर्वी तयारी करताना दिसतात असे पर्यावरण प्रेमी बाबलो नाटेकर यांनी सांगितले.








