वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेतील इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लेनोवोने भारतात आपले उत्पादन सादर करत त्यांची संख्या वाढविण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने देशातील पहिला 5-जी अँड्रॉईड टॅब्लेट बाजारात दाखल केला आहे. यामध्ये मॉडेल्सचे नाव लेनोवा टॅब पी 11 हश असल्याची माहिती आहे. सदरचे उपकरण क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 750 5 जी प्रोसेसवर सुरु होते आणि 11 इंच डिस्प्लेसह सुसज्ज राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
लेनोवा टॅब पी 11 5-जी दोन स्टोरेजमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यांच्या 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किमत ही 29,999 रुपये राहणार असून त्याच वेळी टॅबच्या 256 जीबी स्टोरेज मॉडेलची किमत ही 34,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा टॅब्लेट ऍमेझॉन व अधिकृत लेनोवा स्टोअरवरुन खरेदी करण्याची सुविधा मिळणार आहे.
उपकरणांमध्ये शाओमी व रियलमीच्या मिड रेंज 5 जी टॅब्लेट शाओमी पॅड 5 आणि रियलमी पॅड एक्स यांच्यासोबत स्पर्धा राहणार आहे. शाओमी पॅड 5 यांची किमत ही 26,999 तर रियलमी पॅड एक्सची किंमत 25,999 रुपये राहणार आहे.
लेनोवा टॅब पी 11 चा तपशील
w
5 जी 2000 ते 1200 पिक्सेल रिझोल्यूशन 11 इंच 2 के डिस्प्लेसह
w
डॉल्बी व्हिजन सपोर्टसह आयपीएस स्क्रीन, अँड्रॉईड आपरेंटिंग सिस्टम
w
टॅब्लेट व फोल्डेबल उपकरणांसाठी गुगलची कस्टम ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईड 12 एलला सपोर्ट करतात









