कांदा स्थिर, हिरवा वाटाण्यालाही पसंती
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील आठवड्याच्या तुलनेत लिंबू, टोमॅटो आणि वांगी दरात मोठी घसरण झाली आहे. मात्र इतर भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत. विशेषत: हिरवा वाटाणा बाजारात दाखल झाला आहे. त्यामुळे गृहिणींकडून खरेदी वाढली आहे. हिवाळ्याच्या तोंडावर हिरवा वाटाणा आणि हरभरा दाखल होतो. यंदा देखील नोव्हेंबरपासून वाटाणा आणि हरभरा आवक वाढू लागली आहे.
जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीत भरमसाट वाढ झाली आहे. विशेषत: कडधान्य आणि डाळींच्या किंमती अवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जगणे असह्य होवू लागले आहे. अशा परिस्थितीत काही पाले भाज्यांच्या किंमती कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. दहा रुपयाला दहा लिंबू, टोमॅटो 20 रुपये किलो, तर वांगी 20 रुपये किलो दराने विकली जात आहे. लिंबू, टोमॅटो आणि वांग्याचे दर घसरले आहेत. मात्र कांदा आणि इतर भाजीपाला स्थिर असल्याचे दिसत आहे.









