वृत्तसंस्था/ बंजा लुका (बोन्सिया)
सर्बियाचा टेनिसपटू ड्युसेन लेजोव्हिकने रविवारी येथे झालेल्या एटीपी टूरवरील बंजा लुका आंतरराष्ट्रीय पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे जेतेपद मिळवताना रशियाच्या रुबलेव्हचा पराभव केला. एटीपी टूरवरील लेजोव्हिकचे हे दुसरे विजेतेपद आहे.
या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात लेजोव्हिकने आंद्रे रुबलेव्हचा 6-3, 4-6, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव केला. अंतिम सामना अडीच तास चालला होता. या स्पर्धेत लेजोव्हिकने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आपल्या देशाच्या टॉप सिडेड जोकोव्हीचला पराभवाचा धक्का दिला होता.









