वृत्तसंस्था / लिसेस्टर
इंग्लीश प्रिमीयर लीग फुटबॉल स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात ब्रेटफोर्डने लिसेस्टर सिटीचा 4-0 अशा गोल फरकाने एकतर्फी पराभव केला. ब्रेंटफोर्डने प्रिमीयर लीग स्पर्धेत घरच्या बाहेर झालेल्या मैदानामध्ये सलग 4 सामने जिंकण्याचा क्लबस्तरीय विक्रम केला आहे.
या सामन्यात मध्यंतरापर्यंत ब्रेंटफोर्डने लिसेस्टर सिटीवर 3-0 अशी आघाडी घेतली होती. 17 व्या मिनिटाला विसाने ब्रेंटफोर्डचे खाते उघडले. 27 व्या मिनिटाला ब्रायन मेबुमोने ब्रेंटफोर्डचा दुसरा गोल केला. 33 व्या मिनिटाला कर्णधार नोर गार्डने ब्रेंटफोर्डचा तिसरा गोल नोंदविला. फॅबिओ कार्व्होलोने ब्रेंटफोर्डचा चौथा गोल केला. या सामन्यात शेवटपर्यंत लिसेस्टर सिटीला आपले खाते उघडता आले नाही.









