9 दिवस चालणार कामकाज
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटक विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला होता. यापूर्वी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अधिवेशन सुरू होईल, असे सांगण्यात आले होते. आता सरकारने तारीख निश्चित केली असून 11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या कालावधीत विधिमंडळाचे अधिवेशन बेंगळूरमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी संसदीय कामकाज विभागाचे सचिव जी. श्रीधर यांनी यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. अधिवेशनासंबंधी तात्कालिक वेळापत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन असल्याने, 16 ऑगस्ट रोजी दुसरा शनिवार असल्याने तर 17 ऑगस्ट रविवार असल्याने त्या दिवशी कामकाज चालणार नाही. केवळ 9 दिवस कामकाज चालेल.









