13 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
वृत्तसंस्था/ चंदीगढ
निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या 13 रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या जागांसाठी 4 मार्चपासून नामांकन सुरू होईल तर 21 मार्च रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 4 मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुऊवात होणार आहे. 14 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 21 मार्च रोजी मतदान झाल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजेनंतर मतमोजणी होणार असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा यांनी सांगितले. राज्यातील विधान परिषदेच्या 13 सदस्यांचा कार्यकाळ 5 मे 2024 रोजी संपत आहे. या सदस्यांची रिक्त पदे भरण्यासाठी विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुका-2024 घेण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.









