वृत्तसंस्था/ पुणे
येथे झालेल्या 41 व्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय नौकानयन चॅम्पियनशिप स्पर्धेचे पुरुष विभागातील जेतेपद सेनादलाने पटकावले. सेनादलाच्या नौकानयनपटूंनी एएससीबीच्या नौकानयनपटूंना मागे टाकत विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत सेनादलाने पदकतक्त्यात पहिले स्थान मिळवताना चार सुवर्ण आणि तीन रौप्यपदके मिळवली. एएससीबीने 3 सुवर्ण आणि चार रौप्यपदके घेतली. महिलांच्या विभागात मध्यप्रदेशने विजेतेपद मिळवताना 4 सुवर्ण आणि एक रौप्यपदकाची कमाई केली. केरळने दोन सुवर्णासह दुसरे तर मणीपूरने 1 सुवर्ण आणि 1 रौप्यपदकासह तिसरे स्थान घेतले.









