वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दुसरी लिजेंड्स लिग क्रिकेट स्पर्धा भारतामध्ये नोव्हेंबर महिन्यात भरवली जाणार आहे. सदर स्पर्धा 18 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान खेळवली जाईल. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या पहिल्या लिजेंड्स लिग क्रिकेट स्पर्धेचे अज्ंिक्यपद इंडिया कॅपिटल संघाने जिंकले होते. गेल्या वर्षीच्या झालेल्या स्पर्धेत माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, फिंच, हाशिम आमला, रॉस टेलर आणि गेल यांनी आपला सहभाग दर्शवला होता. या स्पर्धेचे रवि शास्त्री हे प्रमुख आहेत.









