वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
द लिजेंडस् गोल्फ टूरतर्फे पहिलीच गोल्फ स्पर्धा भारतात भरविली जाणार आहे. 28 ऑगस्टला इंडिया लिजेंडस् चॅम्पियनशीप गोल्फ स्पर्धा येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण बक्षीसाची रक्कम 5 लाख डॉलर्स ठेवण्यात आली आहे. सदर स्पर्धा भारताचा माजी गोल्फपटू जीव मिल्खासिंगने आयोजित केली आहे.
या स्पर्धेत यजमान देशाचे 10 गोल्फपटू सहभागी होणार आहेत. 50 वर्षांवरील वयोगटातील गोल्फपटू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. सदर स्पर्धा पीजीए युरोपियन गोल्फ टूर अंतर्गत राहिल.









