सावंतवाडी / प्रतिनिधी
Illegal sand mining in Terekhol river, warning of hunger strike!
कवठणी मलेबागवाडी येथे तेरेखोलखाडीत बेकायदेशीर वाळू उपसा रात्री-अपरात्री होत आहे.परप्रांतीय कामगाराचा त्यासाठी वापर होत आहे. विचारणा केल्यावर हे कामगार जीवे मारण्याची धमकी देतात. तसेच शिवीगाळ करतात.वालु उपसा मुळे किनारपट्टी खचत आहे.त्यामुळे माझ्या बागबागायतीला धोका आहे.याबाबत महसुलला तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे येत्या काळात उपोषण करण्यात येईल .महसुलकडे तक्रार करुन दखल घेतली जात नाही.याबाबत प्रांताधिकारी यानी दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी जान फर्नांडिस यांनी प्रांताधिकारी, सरपंच याच्याकडे केली आहे.