मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळानं आपल्या तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत. या बैठकीत ठाकरे सरकारनं घेतलेला औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आला. ठाकरे सरकारनं शेवटच्या क्षणी घेतलेला हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं स्थगित केला होता. नवी मुंबईतील विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याला मंजुरी देण्यात आले आली आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात लवकरच पालकमंत्र्यांची निवड करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे. शहराच्या व विमानतळाच्या नामांतरावरून कायदा करावा लागतो. तो कायदा तयार करत लवकरच केंद्राची परवानगी मिळवू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आजच्या बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबाद शहराच्या नामांतरासह नवी मुंबई विमानतळाला दि. बा.पाटील यांचं नाव देण्याचा पुनर्निणय घेण्यात आला. लवकरच ठराव करुन प्रस्ताव केंद्राला पाठवणार असल्याची माहिती बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कायदेशीर पेच निर्माण होऊ नये म्हणून ठाकरे सरकारनं घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली होती, असंही ते म्हणाले.
राज्यातील पावसाचा आढावा : मुख्यमंत्री
ज्या ठिकाणी पूर्वपरिस्थती बिकट आहे, तेथील प्रशासनाच्या संपर्कात आहोत. तेलंगणा व कर्नाटक यांच्याशी संवाद सुरु आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. तसेच पालकमंत्री निवडण्यात येतील. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









