सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघटना यांचा उपक्रम
सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती आणि सावंतवाडी वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथील जिल्हा कारागृहात न्यायालयीन बंदीवानांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कायदेविषयक जनजागृती शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी तालुका तालुका विधी सेवा समितीच्या अँड पुजा नाईक, जिल्हा कारागृहाचे अधिक्षक सतिश कांबळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी संदीप एकशिंगे, कारागृह हवालदार अर्जुन घोडके, संदीप शेटे, सुभेदार महादेव गवस आदी उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत सावंतवाडी दिवाणी न्यायालयाच्यावतीने या मध्यस्थी जनजागृती कार्यशाळेचे सावंतवाडीच्या जिल्हा कारागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका तालुका विधी सेवा समितीच्या अँड पुजा नाईक यांनी सावंतवाडी येथील जिल्हा कारागृहात न्यायालयीन बंदीवानांना कायदेविषयक सहाय्य व सल्ला याबाबत बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कारागृहाचे वरिष्ठ तुरुंग अधिकारी संदीप एकशिंगे यांनी तर जिल्हा कारागृहाचे अधिक्षक सतिश कांबळे यांनी सावंतवाडी येथील जिल्हा कारागृहातील न्यायालयीन बंदीवानांना कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित केल्याबद्दल सावंतवाडी तालुका विधी सेवा समितीचे आभार मानले.









