आमदार दीपक केसरकरांच्या माध्यमातून निधी
वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले शहराचा पर्यटनातून विकासाचा घेतलेल्या ध्यासाच्या अनुषंगाने आमदार तथा माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ला नगरपालिकेस पर्यटन विकासाच्या दृष्टीने आकर्षक षटकोनी पथदिपांसाठी दिलेल्या दोन कोटी रुपयांच्या निधीपैकी पहिल्या टप्प्याच्या 1 कोटीच्या निधीतून साकारलेल्या 185 पथदिपांचे उदघाटन वेंगुर्ले नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप यांच्या हस्ते शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे वेंगुर्ला शहरप्रमुख उमेश येरम, श्री देव रामेश्वर देवस्थान विश्वस्त दाजी परब, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुषमा प्रभू खानोलकर, अँड. श्रद्धा बाविस्कर-परब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.पथदिपातून वेंगुर्ला शहर सुशोभीकरणासाठी दीपक केसरकरांकडून दोन कोटीचा निधी प्राप्त झाला आहे . यावेळी बोलताना शिवसेनेची जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी शालेय शिक्षण मंत्री पदाच्या कालावधीत दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले नगरातील पथदीप पर्यटनदृष्ट्या आकर्षक होण्यासाठी सन 2022-23 या वर्षात प्रथम एक कोटी व नंतर एक कोटी असा दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त करून दिला होता त्यातील पहिल्या टप्प्याचे एक कोटीच्या कामाचे उदघाटन आज होत आहे. उर्वरित एक कोटीचे कामाची निवीदा सुरु असून काही दिवसात ते पूर्णत्वास येऊन वेंगुर्ल्यातील पथदीप हे सुद्धा पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल असा विश्वास व्यक्त केला.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून वेंगुर्ला नगर परिषदेस प्राप्त झालेल्या निधीतून आगळ्यावेगळ्या स्वरूपाचे असे षटकोनी सात मीटर उंचीचे एलईडी लाईट ची व्यवस्था करण्यात आलेले आणि दोन पोल मधील अंतर तीस मीटर असलेले 180 षटकोनी पोल हे मठ वेशीपासून ते हॉस्पिटल नाका व रामघाट रोड अणसुर तीठा ते पाँवर हाऊस गणेश मंदिर या भागात अंडरग्राउंड वीज माध्यमातून बसवण्यात आलेले असून या कामाचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुहास कोळसुलकर, माजी नगरसेविका शितल आंगचेकर, माजी नगरसेवक यशवंत किनळेकर, महिला शहर उपसंघटक मनाली परब, अल्पसंख्यांक महिला संघटक शबाना शेख, भाजपाचे युवा मोर्चा पदाधिकारी प्रणव वायंगणकर, वृंदा गवंडळकर आकांक्षा परब, रोशनी वायंगणकर, प्रतीक्षा हळदणकर, शिवसेनेचे संजय परब, राजू परब, देविदास वालावलकर, उमेश आरोलकर, मनीष रेवणकर, प्रदीप परब, संतोष परब, संजना पिंगुळकर, मृणाली गोळम, प्रथमेश परब, नगरपरिषदेचे आर्किटेक श्री. परुळेकर, इंजिनियर विशाल होडावडेकर, सागर चौधरी आदींसह शहरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.









