प्रा. प्रो. भूषण भावे यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
विद्याप्रबोधिनी कॉलेज ऑफ कॉमर्स, एज्युकेशन, कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट पर्वरी, पॉलिसी ऍडव्होकसी रिसर्च सेंटर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इन्स्टिटय़ूटच्या सहकार्याने भांडवली बाजार, म्युज्युअल फंड, यात कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भात विद्याप्रबोधिनी कॉलेज व पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 27 रोजी सायं. 4 वा. इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आशिष कुमार चौहान यांचे व्याख्यान होणार असल्याची माहिती विद्याप्रबोधिनी कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य प्रो. भूषण भावे यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी वाणिज्य विभागाच्या प्रमुख डॉ. उज्वला हणजुणकर, पार्कचे साहाय्यक व्यवस्थापक कौस्तुभ काळोखे उपस्थित होते.
गोव्यात वाणिज्य अभ्यासक्रमासाठी 21 कॉलेज आहेत. या कॉलेजमधून 2500हून जास्त विद्यार्थी वाणिज्य विभागातून पदवीधर होतात. उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी त्यांच्या शिक्षणासंबंधित नसलेले व्यवसाय करतात. त्यामुळे या विभागातील मुलांना त्यांच्यातील कौशल्य पाहून रोजगार करण्यायोग्य बनविता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर विद्याप्रबोधिनी कॉलेजमध्ये टूरिस्ट गाईड, रूम अटेंडंट, पत्रकारिता यासारखे अनेक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. आता बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज कॉलेजमध्ये पहिल्या प्रथम प्रवेश करत आहे. कुठल्याही विभागातील विद्यार्थी यामध्ये प्रवेश घेऊ शकता अशी माहिती प्रो. भूषण भावे यांनी दिली.
युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची उद्दीष्टे बाजारपेठेशी संबंधित कौशल्यांचे पुरेसे प्रशिक्षण प्रदान करणे आणि बॅकेग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रातील महिला आणि तरूणांची रोजगारक्षमता आणि उद्योजकता कौशल्य वाढविणे आणि प्रतिभा विकासाच्या संधी निर्माण करणे हे आहेत. सदर अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्ष 2022-2023मध्ये सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमांसाठी प्रसिद्ध आणि अनुभवी संसाधन व्यक्ती बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि इतर वित्तीय संस्थामधून असतील. हे अभ्यासक्रम सर्वांसाठी खुले असतील. पहिल्यांदा अभ्यासक्रम 20-25 विद्यार्थ्यांच्या बॅचनुसार सुरू करण्यात येतील आणि दोन किंवा तीन कोर्सेस सुरू करण्यात येईल अशी माहिती प्रो. भावे यांनी दिली.









