प्रतिनिधी /बेळगाव
जीआयटीच्या सिव्हिल व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातर्फे ग्रॅज्युएट अफेयर्स ऍण्ड रिसर्च, टेक्सासचे डीन डॉ. महेश होसूर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी टेक्सास विद्यापीठातील संधींची माहिती देऊन आंतर विद्याशाखीय क्षेत्रात किती वाव आहे, याची माहिती दिली.
प्राचार्य डॉ. जयंत कित्तूर यांनी अभियांत्रिकी शिक्षणामध्ये अमर्याद संधी आहेत आणि आजच्या वास्तव जीवनाला सामोरे जाताना वैज्ञानिक दृष्टिकोन अवलंबिणे आवश्यक आहे, असे सांगितले. सिव्हिल विभागाचे प्रमुख डॉ. वैभव चाटे, मेकॅनिकल विभागाचे प्रमुख डॉ. हर्षित कुलकर्णी, प्रा. आर. जे. ठकाई, सोमनाथ खोत, प्रा. वैजनाथ सी., प्रा. बसवराज एस., प्रा. वीणा बडीगेर व प्रा. अर्चना यांनी या कार्यक्रमाचे संचलन केले.
डॉ. विनायक मुतालिक-देसाई यांनी स्वागत केले. राजेंद्र ठकाई यांनी परिचय करून दिला. डॉ. व्ही. आर. चाटे यांनी आभार मानले.









