पाऊस कमी, पण वादळाचे प्रमाण अधिक असल्याने मोठे नुकसान
वार्ताहर /कडोली
कडोली परिसरात बुधवारी हलकासा पाऊस असला तरी वादळाचे प्रमाण जास्त असल्याने येथील एका घराचे वादळाने पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी दुपारी 3 वाजता कडोली परिसरात मध्यम पावसाची हजेरी झाली आहे. ढगाळी वातावरण पाहता मोठा पाऊस होण्याची शक्यता होती पण पावसाने आवरते घेतले. परंतु, वादळाचे प्रमाण अधिक होते. या वादळाने येथील दत्तू चांगाप्पा जाधव यांच्या घराचे संपूर्ण पत्रे उडून गेल्याने घरात ठेवलेले भात भिजले. त्यामुळे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. शिवाय वादळी वाऱ्याने वीज खांब मोडल्याने काही वेळ वीजपुरवठा खंडित होता. वायरमननी तातडीने दुरुस्ती केल्याने वीजपुरवठा सुरळीत झाला.









