कोनोफाइटम पॅगी रोपाबाबत अजब प्रकार
ईश्वराने पृथ्वीवर अनेक सुंदर गोष्टी निर्माण केल्या आहेत. सर्वसाधारणपणे काही झाडांनाच आम्ही ओळखू शकतो. परंतु झाडांच्या काही प्रजाती माहित नसतात. अशाच प्रजातींपैकी एक रोप कोनोफाइटम ज्याची पाने रसाळ आणि गोळ असतात. याच्या प्रजातींमध्ये निघणाऱया पानांचा रंग आणि आकार हुबेहुब मानवी ओठांसारखा असतो.
कोनोफाइटम पॅगी नावाच्या रोपाची पाने पाहिल्यावर तुम्ही अवाप् व्हाल किंवा हा तुम्हाला चेष्टेचा प्रकार वाटेल. परंतु ही निसर्गाची अनोखी निर्मिती आहे. या रोपाची पाने मानवी ओठांसारखी दिसतात. यांचा रंगही एखाद्याने पिंक शेडची लिपस्टिक लावली असेल अशाप्रकारचा असतो.

कोनोफाइटम प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेतील नामीबिया या देशात आढळून येतो. हे रोप रसाळ असते आणि दगडांमध्ये ते उगवते. या प्रजातीचे रोपं छोटी असतात आणि याची पाने आंशिक स्वरुपात स्वतःच्या केंद्राशी जोडलेली असतात. प्रत्येक पाने एक जोडी म्हणून असते आणि गोल, अंडाकृती किवा शंखाच्या आकारासारखी असतात. कोनोफाइटमच्या अनेक प्रजाती असून यातील एक कोनोफाइटम पॅगी आहे.
पानांच्या मध्ये तयार झालेल्या खोलगट भागातून फूल बाहेर येते, जे सर्वसाधारणपणे पांढऱया किंवा पिवळय़ा रंगाचे असते. अनेक कोनोफाइटमची पाने दगडांसारखी असतात, ज्यांना वेगळे करणे सोपे नसते. या रोपांची छायाचित्रे ट्विटरवर शेअर करण्यात आली आहेत.









