देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेजात शहीद बाबू गेनू बलिदान दिवस उदमिता प्रोत्साहन संमेलन संपन्न
सावंतवाडी प्रतिनिधी
संपूर्ण जगात सिंधुदुर्ग जिल्हा हा सर्वोत्कृष्ट असा भाग आहे. या भागात सर्वकाही आहे. आज आपण स्वदेशीचा सर्रास विचार करायला हवा. सिंधुदुर्गात व्यावसायिक अभ्यासक्रमाला चालना देशभक्त शंकरराव गव्हाणकर कॉलेजच्या माध्यमातून संस्था अध्यक्ष किरण ठाकूर यांनी उपलब्ध करून दिली आहे. तुम्हाला तुमच्याच भागात राहून व्यावसायिक अभ्यासक्रम निवडता येऊन त्यामध्ये पारंगत होता येणार आहे. मात्र यातून तुम्ही निश्चितपणे या सिंधुदुर्ग जिल्हावासियांना आणि या संस्थेला तुमच्या कामातून परतफेड करा. आज तरुणाने स्वतःची बचत करायला शिकायला हवी. आपण अभ्यासक्रम निवडताना विचारपूर्वक निवडायला हवा. स्वदेशीचा वापर वाढवायला शिका असे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी यांनी स्पष्ट केले.सावंतवाडी येथील देशभक्त शंकरराव गव्हाणकर कॉलेजमध्ये स्वावलंबी भारत अभियान कोकण प्रांत ,सिंधुदुर्ग जिल्हा अंतर्गत शहीद बाबू गेनू बलिदान दिवस उदमिता प्रोत्साहन संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री दळवी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस , भारत अभियान कोकण प्रांत समन्वयक अमित नाईक ,प्राध्यापक शैलेश गावडे ,आनंद नाईक ,अस्मिता गवस ,मेधा मयेकर आदी उपस्थित होते .
यावेळी शहीद बाबू गेनू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वदेशीचा विचार आपल्यापर्यंत पोहोचून बलिदान देणारे शहीद बाबू गेनू यांच्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री दळवी म्हणाले शहीद बाबू गेनू यांनी स्वदेशीचा विचार आपल्यापर्यंत पोहोचवून देशासाठी बलिदान दिले. त्यांच्याकडून आपण शिकले पाहिजे असेही ते म्हणाले . वाडोस – गोटोस भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी दुधाळ म्हशी पालन व्यवसाय सुरू करून आज ते महिन्याला 50 हजार रुपये कमवत आहेत. ते इथे एक – दीड वर्षात महिन्याला एक ते दीड लाख रुपये कमावतील. हा पॅटर्न प्रत्येक विद्यार्थ्यांनी अंगी बाणवायला हवा असेही ते म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून आज तीन तरुणांनी हरियाणा येथून दुधाळ म्हशी खरेदी केल्या. दीड वर्षात त्यांनी हा उपक्रम राबवून आदर्श घडवून दिला. तसे तुम्ही स्वावलंबी बना असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी समन्वयक अमित नाईक म्हणालेजगात 37 करोड तरुण आहेत. तरुणांनी आता स्वावलंबी बनून उद्योग क्षेत्रात प्रगती करायला हवी. तंत्रज्ञानाचा योग्य अभ्यास करून तुम्ही उद्योजक व्यावसायिक बना असे ते म्हणाले .









